Jitendra Awhad | Vision-Mission

पेट स्कॅन सेंटर (कॅन्सर निदान केंद्र)

कर्करोगाचे निदान करण्यासाठी महागड्या चाचण्या कराव्या लागतात, पेट स्कॅन चाचणीद्वारे कर्करोगाचे लगेच निदान होते. यामुणे कर्करोगाच्या रुग्णांवर तातडीने उपचार करुन त्याचे प्राण वाचविणे शक्य होते. परंतु, पेट स्कॅनची सुविधा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये असून या चाचणीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळेल, अशी कोणतीही शासकीय यंत्रणा अस्तित्वात नाही. अगदी कॅन्सर या रोगाचे निदान करण्यासाठी ठाणेकरांना थेट टाटा मेमोरियल हास्पिटल किंवा बॉम्बे हास्पिटल गाठावे लागते. ही अडचण ध्यानात आल्यानेच मुंब्र येथे कर्करोगाचे निदान होईल, असे 'पेट स्कॅन सेंटर' कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित केले आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिका आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात असून लवकरच हे केंद्र उभे राहणार आहे. लागणार आहे.