Jitendra Awhad | Vision-Mission

मफतलालच्या भूखंडावर देशातील सर्वात मोठी टाऊनशिप उभारणार

घर, अधिकृत की अनधिकृत या वादात न पडता गरजेपोटी आपल्या कुटुंबासाठी घेतलेला निवारा ही बाव डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी अधिक महत्वाचा आहे...

कळवा पूर्व परिसरातील परिस्थिती काहीशी अशीच आहे. या भागाचा सुनियोजित विकास करण्यसाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड हे प्रयत्नशील आहे. मफतलाल कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडली असून त्याच्या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे; कामगारांची देणी प्रलंबित आहेत.

अस्ताव्यस्त विस्तारलेल्या कळवा पूर्वेला सुनियोजित शहराप्रमाणे वसविण्यासाठी मोठ्या भूखंडाची गरज होती. मफतलाल कंपनीचा भूखंड ही गरज भागवणार आहे. त्यासाठी म्हाडाने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. मफतलाल कंपनीची ही सर्व जागा न्यायालयाद्वारे विकत घेण्याची म्हाडाची तयारी आहे. जमीन विकत घेत असताना सामाजिक भानही राखले जाणार आहे. गेली अनेक वर्षे आपली देणी मिळतील, या आशेने न्यायालयाकडे नजरा लावून बसलेल्या मफतलालच्या कामगारांना वार्‍यावर सोडणार नाही; ही जमीन विकत घेतानाच सर्व कामगारांची देणी देऊन येथे २१ हजार परे बांधण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधिन आहे. मफतलालचा भूखंड विकसीत करीत असतानाच मफतलाल भूखंडाशेजारी असलेली झोपडपट्टीही विकसीत करण्यात येणार आहे. या ठिकाणी नव्याने रोजगार निर्मिती होणार असल्याने आपल्या परिसरात नागरिकांना रोजगाराची संधीदेखील निर्माण होणार आहे. या संदर्भात न्यायालयीन पातळीवर लढा सुरु असून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.