Jitendra Awhad | Vision-Mission

नाट्यगृह आणि ॲम्फी थिएटर

ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम गडकरी रंगायतन गेल्या दोन तपांपेक्षा अधिक काळ करीत आहे. घोडबंदर भागासाठी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आले, परंतु कळवा-मुंब्रा भागातील रसिकांसाठी एकही नाट्यगृह नाही. त्यामुळे सप्टेंबर २०११ मध्ये मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नाट्यगृहासाठी जागा व निधी देण्याची मागणी केली होती.

ठाणे महानगर पालिकेच्या विकास आराखड्यानुसार कळव्यात अमृतांगण सोसायटीच्या मागील बाजूस नाट्यगृहाचे आरक्षण नव्हते. खारीगांव येथील सेक्टर आठमध्ये सुमारे १४ हजार चौरस मीटरची जागा रिक्रीएशनल ग्राऊंडसाठी (आरजी) आरक्षित होती. त्यापैकी १३०० चौ. मीटरची जागा पाणीपुरवठा विभागाच्या संप आणि पंप हाऊसच्या कामासाठी ठेऊन उर्वरित जागा नाट्यगृहासाठी मिळवली आहे. या नाट्यगृहात खुल्या नाट्यगृहासाठीही जागा असेल. पारसिक नगरातील नेचर ग्लोरीनजीक बीओटी तत्वावर नाट्यगृह तर पारसिक नगर परिसरातील किशोर पार्कच्या मागील भूखंडावर ॲम्फी थिएटरसाठी बजेटमध्ये तरतूदही मी करून घेतली आहे.