Jitendra Awhad | Vision-Mission

वारकरी भवन

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. महानुभव पंथ- संत ज्ञानेश्वरांपासून सुरु झालेली ही परंपरा अव्याहतपणे आजही सुरु आहे. या महानुभावांच्या शिकवणीवरच आजचा वारकरी ही संतपरंपरा जपत आहे. महाराष्ट्राचा आत्मा असलेली संतपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहचावी, या उद्देशाने पाटबंधारे खात्याच्या शेजारी असलेल्या भूखंडावर वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनात संतसाहित्याचा जागर होणार असून लोककला आणि लोकगितांसाठी स्वतंत्र दालनही उभारण्यात येणार आहे.