Jitendra Awhad | Vision-Mission

विटावा आणि रेतीबंदर पादचारी पूल

ठाणे-बेलापूर मार्गावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. विटावा नाका आणि हॉटेल मालवण तडका येथे विटावा, सूर्यनगर भागात प्रवेश करण्यासाठीचे प्रवेशद्वार आहेत. मात्र, या भागातील वाहतूक कोंडी, रिक्षांचे स्टँड यामुळे रस्ता ओलांडणे लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना अत्यंत त्रासदायक ठरत असते. अनेकदा तर अपघातही घडत असतात. विटावावासियांना निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी विटावा नाका येथील वाहतूक पोलीस चौकी समोर पादचारी पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे कळवा-पारसिक चौपाटीजवळील आत्माराम पाटील चौक प्रचंड विस्तीर्ण आहे. अवजड वाहनांची रेलचेल, वेगात धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा गदारोळ यामुळे आत्माराम पाटील चौकात रस्ता ओलांडणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. चौपाटीचे काम पूर्ण झाल्यानंतर तर येथे पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे येथे पादचारी पुलाची नितांत गरज भासणार आहे. याची जाणीव असल्याने पुढील काळाची गरज म्हणून आत्माराम पाटील चौकात ५८.२० मीटर लांबीचा आणि ३.५० मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. चौपाटीजवळील सेवा रस्त्यांवर जिना बांधण्यात येणार असून याशिवाय, चौपाटी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता स्वतंत्र आसन व्यवस्थाही तयार केली जाणार आहे. या दोन्ही पुलांचे आराखडे तयार झाले असून लवकरच या पुलांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.