Jitendra Awhad | Vision-Mission

सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रित नियोजन

मुंब्रा हा ठाणे महापालिकेचाच एक भाग असला तरी आजवर या भागाच्या पदरी सापत्न वागणूक पडली, मुख्य शहर विकासाच्या लाटेवर स्वार होत असताना मुंब्रा दुर्दशेच्या गर्तेत बुडाले होते. मोठ्या बँकांच्या एटीएमपासून ते नोकरी मिळण्यापर्यंत आणि परदेशात जाताना एअरपोर्टवरील जाचापासून ते चांगल्या भागात घर विकत घेण्यापर्यंत प्रत्येक कामांसाठी इथल्या रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत होता. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी मुंब्रा येथे दोन एकर जागेवर १० मजली शासकीय कार्यालयांचे हब उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार झाला आहे.

बाहुबली ट्रस्टच्या सात एकर भूखंडावर ही १० मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायालयीन लढ्यातदेखील यश मिळाले आहे. मुंब्रा स्टेशन पासून जवळ असलेल्या या ठिकाणी मुंब्रा पोलीस ठाणे, प्रभाग समिती कार्यालय, अग्नीशमन दल, तलाठी कार्यालय, महावितरण कार्यालय, पोस्ट कार्यालय आदींसह अनेक शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे कौसा मुंब्रावासियांना एकाच छताखाली अनेक सुविधा मिळणार आहेत. येथील शासकीय कार्यालयांसाठीची प्रस्तावित इमारत आणि प्रभाग समिती इमारतीसाठी सुमारे ५० कोटी ६५ लाख ६८ हजार ३७२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.