Jitendra Awhad | Home

प्रवास अवलियाचा...!

शोषित, पीडित, दलित अन्‌‍ अल्पसंख्यांक यांच्यासाठी आश्वासक नेतृत्व म्हणून जर कोणाकडे पाहिले जात असेल तर ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच! कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अत्यंत गरीब अशा कुटुंबात 5 ऑगस्ट 1963 रोजी नाशिक येथे जन्माला आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना लहानपणापासूनच गरीबी आणि सामाजिक उतरंडीचे चटके सोसावे लागले. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण लाभत नाही, याच उक्तीप्रमाणे पोटाची आग विझवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या माता-पित्याने मुंबईची वाट धरली. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करीत वडील कै. सतीश आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आईने शिवणकाम करुन मुलांच्या शिक्षणावर कटाक्ष ठेवला. गरीबी मुलांच्या शिक्षणाची शत्रू ठरु नये, या धारणेतून आई कै. लिलावती आव्हाड यांनी कधी धाकाने तर कधी प्रेमाने जितेंद्र आव्हाड यांचे शिक्षण पूर्ण केले. मुळातच बंडखोर असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थी दशेतच सामाजिक कार्याला सुरुवात केली. स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांच्या वक्तृत्वाची खुबी होती.

Read More

कर्तव्यपथावर अविरत वाटचाल...!

सह्याद्रीचा परिसस्पर्श

आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे नाते अरुणी आणि गुरु धौम्य यांच्याप्रमाणेच आहे. पद्मसिंह पाटील आणि सुरेश कलमाडी यांच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शरदचंद्र पवार साहेब यांचा परिसस्पर्श लाभला. या परिसाच्या स्पर्शाने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आयुष्याचे सोने झाले. शरदचंद्र पवारसाहेबांच्या सहवासात राहिल्याने विकासाभिमुख राजकारणाची गोडी नव्हे तर सवय लागली. वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, जनतेच्या अडी-अडचणी सोडवणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द जवळून पाहिल्यामुळेच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या अंगी बाणवली गेली. अन्‌‍ त्यामुळेच कधीकाळी अत्यंत मागास असलेल्या कळवा- मुंब्रा या ठाणे शहरावरुन उतरुन टाकलेल्या दोन उपनगरांचा कायापालट झाला. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्वच स्तरांवर आज कळवा- मुंब्रा हा त्यांचा मतदारसंघ प्रगत मतदारसंघ म्हणून राज्याच्या पटलावर ओळखला जात आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड :
आधुनिक जटायू

जटायू हे तसे पाहता रामायणातील पात्र! जटायू म्हणजे एक पक्षी, असे अनेकजण म्हणतील! पण, जटायू म्हणजे पक्षी नसून ती एक निष्ठा आहे!! आपल्या स्वामीच्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यानंतर त्याला अडवण्यासाठी प्राणाची आहुती देणारे दैवी पात्र म्हणजे जटायू. कोणत्याही पक्ष्याचे पंख हेच त्याची ताकद असते. मात्र, आपली आपली स्वामीनिष्ठा टिकवण्यासाठी आपल्या पंखांचे बलिदान देऊन स्वामीच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष पुकारणारे लोक खूपच कमी असतात. सद्याच्या राजकीय पटलावर पाहिल्यास असे जटायू कुठेच दिसत नाहीत. आज स्वार्थ साधण्यासाठी ज्या उड्या मारल्या जात आहेत. त्या उड्यांकडे पाहिल्यास निष्ठेची विष्ठा करण्यावरच अनेकांचा भर असतो. सत्तेच्या सारीपाटाचा डाव जिंकण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांच्या दमणशाहीला बळी पडून जटायू होण्याऐवजी लोक सुग्रीवाचा भाऊ बाली होण्यातच धन्यता मानत असतात. अशा परिस्थितीमध्येही आपल्या साहेबांच्या म्हणजेच शरद पवारांसाठी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावून जटायूची भूमिका पार पाडणारे एकमेव व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे...

Read More

रणझुंजार

डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आंदोलने हे समीकरणच आहे. आपल्या आयुष्याची राजकीय तथा सामाजिक कारकिर्द आंदोलनातूनच सुरु करणारे जे काही नेते आहेत; त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे नाव अग्रक्रमावर आहे. महाविद्यालयीन जीवनातच फी वाढीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलनरत झालेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांची रस्त्यावरची; कागदावरची आणि विधिमंडळातील आंदोलने हा अभ्यासाचा विषय आहे. विविध क्लृप्त्या करुन नवनवीन आंदोलने करणे आणि त्यातून जनहित साधणे ही कल्पकता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठायी आहे. अर्थात, आंदोलने ही केवळ रस्त्यावरचीच असतात, असे नाही. तर, आंदोलने ही वैचारिकही असतात. त्यातूनच त्यांनी सन 2000 च्या दशकात ठाणेकरांना वैचारिक खाद्य पुरवणारी अनोखी आंदोलने केली. विविध क्षेत्रातील विचारवंतांना ठाण्यात एकाच मंचावर आणून त्याद्वारे अनेक सामाजिक विषयांना पटलावर आणले. अनेक ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, बडे राजकीय नेते यांना एकाच मंचावर आणून संघर्ष या संस्थेच्या साह्याने वैचारिक मंथन घडवून आणले.

Read More

ध्येयवादी नेतृत्व...

आपण जिथे राहतो त्या विभागाला, आपल्या शहराला, आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला व्हिजन नसलेले नेतृत्व लाभले तर मानवी विकासाला मर्यादा येत असतात. पण, जर आपल्या विभागाला, आपल्या शहराला, आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला भविष्याची काळजी वाहणारे नेतृत्व लाभले तर विद्यमान स्थितीतील नागरिकांचाच नव्हे तर नव्याने जन्माला येणाऱ्या पिढीचेही भवितव्य सुनिश्चित होत असते. याबाबतीत मुंब्रा-कळवा येथील नागरिक भाग्यवान ठरले आहेत. २००९ च्या आधी विकास म्हणजे काय, असा प्रश्न ज्या नागरिकांना पडत होता; त्याच भागातील नागरिकांची स्पर्धा आता मुंबईतील उच्चभ्रू वसाहतींशी व्हावी, असा कायापालट होऊ लागला आहे. जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठीच डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आणखी काही प्रकल्पांना आपल्या मतदारसंघामध्ये स्थान देण्याचे ठरविले आहे. विटावामधील नवी टाऊनशिप, पटनी ते कोपरी उड्डाणपुल, कळवा खाडीपूल ते आत्माराम पाटील चौक समांतर रस्ता, विटावा आणि रेतीबंदर पादचारी पूल, कळवा पूर्वेकडील ॲडव्हेंचर पार्क, वारकरी भवन, नाट्यगृह आणि ॲम्फी थिएटर, कळवा आणि मुंब्रा येथे पेट स्कॅन सेंटर (कॅन्सर निदान केंद्र), आत्माराम पाटील चौक ते कल्याण फाटा भुयारी मार्ग, चुहा ब्रिज ते मित्तल रोड आणि सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रित नियोजन असे एक ना अनेक प्रकल्प डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी योजिले आहेत.

Read More

न्यूज

Read More

मीडिया

Read More

परखड बोल

तुमचे प्रश्न पाठवा

मी तुमचा आवाज होईन